भारताचे उपराष्ट्रपती
भारत देशाचे उपराष्ट्रपती / From Wikipedia, the free encyclopedia
भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
जलद तथ्य भारताचे उपराष्ट्रपती Vice President of India, निवास ...
भारताचे उपराष्ट्रपती
Vice President of India | |
---|---|
निवास | उपराष्ट्रपती भवन |
नियुक्ती कर्ता | भारताचे इलेक्ट्रोरल कॉलेज |
कालावधी | ५ वर्ष |
निर्मिती | १३ मे १९५२ |
पहिले पदधारक | सर्वपल्ली राधाकृष्णन |
वेतन | ₹ ४,००,००० प्रति महिना |
संकेतस्थळ | vicepresidentofindia.nic.in |
बंद करा