पश्चिम आशिया
आशियाई खंडाचा उपप्रदेश / From Wikipedia, the free encyclopedia
पश्चिम आशिया हा आशिया खंडामधील सर्वात पश्चिमेकडील भौगोलिक प्रदेश आहे. अनेकदा ह्या भागाचा उल्लेख करण्यासाठी मध्यपूर्व हे नाव देखील वापरले जाते. परंतु संयुक्त राष्ट्रे व इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्था पश्चिम आशिया हेच नाव वापरतात.
जलद तथ्य पश्चिम आशिया, क्षेत्रफळ ...
पश्चिम आशिया | |
---|---|
क्षेत्रफळ | ६२,५५,१६० चौ. किमी (२४,१५,१३० चौ. मैल) |
लोकसंख्या | ३१,३४,२८,००० |
घनता | ५०.१ /चौ. किमी (१३० /चौ. मैल) |
देश | |
जीडीपी | $२.७४२ निखर्व (२०१०) |
दरडोई उत्पन्न | $८,७४८ (२०१०) |
प्रमाणवेळा | यूटीसी+०२:०० - यूटीसी+०५:०० |
मोठी शहरे |
इस्तंबूल तेहरान बगदाद रियाध अंकारा |
बंद करा
पश्चिम आशिया पूर्व युरोप प्रदेशाच्या दक्षिणेस स्थित असून तो एजियन समुद्र, काळा समुद्र, भूमध्य समुद्र, अरबी समुद्र, कॅस्पियन समुद्र, इराणचे आखात व लाल समुद्र ह्या सात समुद्रांनी वेढला गेला आहे. उत्तरेकडे हा प्रदेश युरोपापासून कॉकेसस पर्वताने वेगळा केला गेला आहे.