उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री / From Wikipedia, the free encyclopedia
उद्धव बाळासाहेब ठाकरे (२७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत.[1] इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.[2] १४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली.[3][4] २९ जून २०२२ रोजी आघाडी सरकार अल्पमतात गेल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिला.
उद्धव ठाकरे | |
कार्यकाळ २८ नोव्हेंबर २०१९ – २९ जून २०२२ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
मागील | देवेंद्र गंगाधरराव फडणवीस |
पुढील | एकनाथ संभाजी शिंदे |
विद्यमान | |
पदग्रहण १४ जुलै २०२० | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
मतदारसंघ | विधानसभा सदस्यद्वारा निवड |
जन्म | २७ जुलै, १९६० (1960-07-27) (वय: ६३) मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) |
आई | मीना ठाकरे |
वडील | बाळासाहेब ठाकरे |
नाते | ठाकरे कुटुंब |
अपत्ये | आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे |
धर्म | हिंदू धर्म |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
शिवसेनेची हिंसक संघटना अशी प्रतिमा बदलून सुसंघटित पक्ष अशी नवीन ओळख देण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले.[5] एक उत्तम संघटित आणि सुसज्ज राजकीय पक्ष निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
उद्धव ठाकरे हे निपुण छायाचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची यशस्वी छायाचित्र प्रदर्शने आहेत. त्यांनी "महाराष्ट्र देशा" (२०१०) आणि "पहावा विठ्ठल" (२०११) नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत.[6]