अलक्ष्मी
From Wikipedia, the free encyclopedia
अलक्ष्मी (संस्कृत: अलक्ष्मी, IAST: alakṣmī , इंग्रजी- Goddess of misfortune, bad luck ) ही हिन्दू धर्मात दुर्भाग्याची देवी आहे .[1]अशुभ, पाप, दारिद्ऱ्य, वेदना, क्लेश, धार, विनाश, अधर्माची देवता असल्याचे म्हटले जाते. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते.
जलद तथ्य
अलक्ष्मी | |
दुर्भाग्य - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | अलक्ष्मी |
संस्कृत | अलक्ष्मीः |
निवासस्थान | पिंपळ वृक्ष |
लोक | नरक, निर्ऋती, दिक्पाल |
वाहन | गाढव, कावळा |
शस्त्र | केरसुणी |
पती | कलि (राक्षस) |
अपत्ये | मृत्यू, अधर्म |
अन्य नावे/ नामांतरे | ज्येष्ठा देवी, निर्ऋती, विषमलक्ष्मी |
या अवताराची मुख्य देवता | निर्ऋती, धुमावती |
नामोल्लेख | पद्मापुराण, विष्णु पुराण लिगंपुराण, कल्किपुराण, श्रीसुक्त |
बंद करा
पद्मपुराणात , ऋग्वेदात निर्ऋती[2] देवी नाव आढळते, ती (अष्ट-दिक्पाल)आठ दिशामधील नैर्ऋत्य दिशेची देवता.[3] मुखेड येथील महादेव मंदिरावरील हातात झाडू, व वाहन गाढव असलेली मूर्ती अलक्ष्मी असल्याचे काहींनी मांडले आहे. पण ती दिगंबर मूर्ती अलक्ष्मीची नाहीतर शीतलामाता देवीची आहे..केरसुणी, गाढव आहेच पण कपाल, नरमुंड आणि वेताळपण आहे..अन्य लक्षणेही शीतलामातेची आहेत.. शीतला मातेने ज्वरासुराचा वध केला होता..