हंपी
कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीच्या काठावरील एक गाव. / From Wikipedia, the free encyclopedia
हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे.[2] अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक "किल्ले, नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा" समावेश आहे.[3] यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान (austere, grandiose site) असे केले आहे.
जलद तथ्य युनेस्को जागतिक वारसा स्थळ, स्थान ...
युनेस्को जागतिक वारसा स्थळ | |
---|---|
स्थान | विजयनगर जिल्हा, कर्नाटक, भारत[1] |
समाविष्ट | विरूपाक्ष मंदिर |
जागतिक वारसा साइट निवडीसाठीचा निकष | सांस्कृतिक: i, iii, iv |
संदर्भ | २४१ |
सूचीकरण | 1986 (10वे सत्र) |
चिंताजनक | १९९९–२००६ |
क्षेत्रफळ | ४,१८७.२४ हे |
बफर झोन | १९,४५३.६२ ha |
संकेतस्थळ | भारतीय पुरातत्व सर्वेक्षण - हम्पी |
स्थान निर्देशक | 15°20′04″N 76°27′44″E |
बंद करा