अमेरिकेची संयुक्त संस्थाने
उत्तर अमेरिका खंडातील देश / From Wikipedia, the free encyclopedia
अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. त्याला अमेरिका आणि युनायटेड स्टेट्स (संयुक्त संस्थाने) या नावानींही ओळखले जाते.
अमेरिका United States of America अमेरिकेची संयुक्त संस्थाने | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: E Pluribus Unum (पारंपरिक; अर्थ : विविधतेत एकता) In God We Trust (अधिकृत, १९५६ पासून) | |||||
राष्ट्रगीत: स्टार स्पॅंगल्ड बॅनर | |||||
अमेरिकाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | वॉशिंग्टन डी.सी. | ||||
सर्वात मोठे शहर | न्यू यॉर्क शहर | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश भाषा | ||||
इतर प्रमुख भाषा | इंग्रजी | ||||
सरकार | संघीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | जोसेफ बायडेन, जुनियर (राष्ट्राध्यक्ष) | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (ब्रिटनपासून) जुलै ४,१७७६ (घोषित) सप्टेंबर ३, १७८३ (मान्यता) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ९६,३१,४२० किमी२ (४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ४.८७ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | ३४,११,९५,००० (३वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १२.२८ निखर्व अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४१,३९९ अमेरिकन डॉलर (३वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | अमेरिकन डॉलर (USD) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी -५ ते -१०/ -४ ते -१० तास | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | US | ||||
आंतरजाल प्रत्यय | .us, .gov, .edu, .mil, .um | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +१ | ||||
[[Image:|300px|center|राष्ट्र_नकाशा]] | |||||
अमेरिका हा राज्यकारभाराची लोकशाही प्रणाली मानणारा जगातील क्षेत्रफळाने मोठ्या देशांपैकी प्रमुख असून येथील राज्यप्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' (वाॅशिंग्टन, डिस्ट्रिक्ट कोलंबिया) येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.
अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.
अमेरिकन डॉलर हे अमेरिकेचे चलन आहे.