सिरिलिक लिपी
From Wikipedia, the free encyclopedia
सिरिलिक (बल्गेरियन: кирилица, रशियन: кири́ллица, सर्बियन: ћирилица) ही ९व्या शतकात बल्गेरिया देशामध्ये निर्माण झालेली एक लिपी आहे. मध्य व पूर्व युरोपात वापरल्या जाणाऱ्या अनेक भाषांमध्ये (विशेषतः भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या घटक देशांमधील भाषा) सिरिलिक लिपीचा वापर आढळून येतो. सिरिलिक लिपी बेलारुशियन, बॉस्नियन, बल्गेरियन, रशियन, सर्बियन, मॅसिडोनियन, माँटेनिग्रिन व युक्रेनियन आणि इतर अनेक स्लाव्हिक भाषांमध्ये वापरण्यात येते.