सचिन तेंडुलकर
भारतीय क्रिकेट पटू / From Wikipedia, the free encyclopedia
सचिन रमेश तेंडुलकर ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, मुंबई) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.[1] २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. इ.स. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.[ संदर्भ हवा ]
सचिन तेंडुलकर | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | सचिन रमेश तेंडुलकर | |||
उपाख्य | मास्टर ब्लास्टर, तेंडल्या, सच्चू [2] | |||
जन्म | २४ एप्रिल, १९७३ (1973-04-24) (वय: ५०) | |||
भारत | ||||
उंची | ५ फु ५ इं (१.६५ मी) | |||
विशेषता | फलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने लेग ब्रेक/ऑफ ब्रेक/मध्यमगती | |||
आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
एकदिवसीय शर्ट क्र. | १० | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
१९८८ | सीसीआय | |||
१९९२ | यॉर्कशायर | |||
१९८८ | मुंबई | |||
२००८ | मुंबई इंडियन्स | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
सामने | २०० | ४६३ | ३०७ | ५५१ |
धावा | १५,९२१ | १८४२६ | २५२२८ | २१९९९ |
फलंदाजीची सरासरी | ५३.७९ | ४४.८३ | ५७.८६ | ४५.५४ |
शतके/अर्धशतके | ५१/६८ | ४९/९६ | ८१/११४ | ६०/११४ |
सर्वोच्च धावसंख्या | २४८* | २००* | २४८* | २००* |
चेंडू | ४२१० | ८०५४ | ७५६३ | १०२३० |
बळी | ४५ | १५४ | ७० | २०१ |
गोलंदाजीची सरासरी | ५४.६८ | ४४.४८ | ६२.१८ | ४२.१७ |
एका डावात ५ बळी | ० | २ | ० | २ |
एका सामन्यात १० बळी | ० | n/a | ० | n/a |
सर्वोत्तम गोलंदाजी | ३/१० | ५/३२ | ३/१० | ५/३२ |
झेल/यष्टीचीत | ११५/– | १४०/– | १८६/– | १७५/– |
१५ जून, इ.स. २०१३ |
विशेष लेख |
---|
या लेखातील मार्च १९, इ.स. २०१२ च्या रात्री ११.३३ (ग्रीनीच प्रमाणवेळ) वाजता केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १०,००,०००वा बदल होता. |
पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचे खासदारही होते.[ संदर्भ हवा ]