विंडोज ९८
From Wikipedia, the free encyclopedia
विंडोज ९८ (सांकेतिक नाव मेम्फिस) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीची चित्रमय संगणक संचालन प्रणाली आहे. ती विंडोज ९क्ष मालिकेतील दुसरी महत्त्वाची प्रकाशित संचालन प्रणाली आहे. मे १५, १९९८ रोजी ती उत्पादनासाठी प्रकाशित झाली तर रिटेलसाठी जून २५, १९९८ रोजी प्रकाशित झाली. विंडोज ९८ ही संचालन प्रणाली विंडोज ९५च्या अनुक्रमिक आहे. आपल्या पूर्वक्रमिकाप्रमाणेच विंडोज ९८ मध्ये एमएस-डॉस आधारित बूट लोडर होते तसेच विंडोज ९८ हायब्रिड १६-बिट/३२-बिट एकसंघ उत्पादन होते. विंडोज ९८ च्या नंतर विंडोज ९८ द्वितीय आवृत्ती ही मे ५, १९९९ रोजी व त्यानंतर विंडोज एमई ही सप्टेंबर १४, २००० रोजी प्रकाशित झाली. विंडोज ९८ साठीचे मायक्रोसॉफ्टचे समर्थन जुलै ११, २००६ रोजी समाप्त झाले.
जलद तथ्य विंडोज ९८, विकासक ...
विंडोज ९८ | |
---|---|
मायक्रोसॉफ्ट विंडोज चा एक भाग | |
विंडोज ९८ ची झलक | |
विकासक | |
मायक्रोसॉफ्ट | |
आवृत्त्या | |
प्रकाशन दिनांक |
आरटीएम: मे १५, १९९८ रिटेल: जून २५, १९९८ (माहिती) |
सद्य आवृत्ती |
पहिली आवृत्ती: ४.१ (बिल्ड २०००, सेवा पॅक १) (जून २५, १९९८) दुसरी आवृत्ती: ४.१ (बिल्ड २२२२ ए) (मे ५, १९९९) (माहिती) |
स्रोत पद्धती | छुपा स्रोत |
परवाना | मायक्रोसॉफ्ट इयुएलए |
केर्नेल प्रकार | मोनोलिथिक केर्नेल |
पूर्वाधिकारी | विंडोज ९५ |
उत्तराधिकारी | विंडोज एमई |
समर्थन स्थिती जुलै ११, २००६ पासून असमर्थित |
बंद करा