रफायेल
From Wikipedia, the free encyclopedia
रफाएल्लो सान्झियो दा उर्बिनो (इटालियन: Raffaello Sanzio da Urbino) (२८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३ - ६ एप्रिल, इ.स. १५२०) हा रानिसां काळातील एक इटलियन चित्रकार व स्थापत्यकार होता. रफायेल, मिकेलेंजेलो व लिओनार्दो दा विंची ह्या त्रिकुटाला त्या काळातील सर्वोत्तम कलाकारांचा गट मानला जातो.
जलद तथ्य रफायेल Raphael (इटालियन), जन्म ...
रफायेल Raphael (इटालियन) | |
---|---|
जन्म |
२८ मार्च इ.स. १४८३ किंवा ६ एप्रिल १४८३ उर्बिनो, मार्के |
मृत्यू |
६ एप्रिल, इ.स. १५२० रोम |
पेशा | चित्रकार, स्थापत्यकार |
कारकिर्दीचा काळ | रानिसां |
बंद करा
रफल याच्याशी गल्लत करू नका.
केवळ ३७ वर्षे आयुष्य जगलेल्या रफायेलने आपल्या अल्प कारकिर्दीत अनेक रचनांची निर्मिती केली. या चित्रांतील रंगसंगती, जिवंतपणा व कमालीची आकर्षकता या गुणांमुळे या चित्रांची जगातील प्रमुख मोजक्या कलाकृतीत गणना केली जाते.
ह्यांपैकी अनेक चित्रे व्हॅटिकन येथील पोपच्या निवासस्थानाच्या सजावटीसाठी रफायेलने रंगवली.