फ्लोरेन्स
From Wikipedia, the free encyclopedia
फिरेंत्से किंवा फ्लोरेन्स (इटालियन: Firenze, उच्चार ) ही इटली देशाच्या मधील तोस्काना प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्लोरेन्स शहराची लोकसंख्या सुमारे ३.७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १५ लाख आहे.
फिरेंत्से (फ्लोरेन्स) Firenze |
||
इटलीमधील शहर | ||
|
||
गुणक: 43°47′N 11°15′E |
||
देश | इटली | |
प्रदेश | तोस्काना | |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ८० | |
क्षेत्रफळ | १०२.४ चौ. किमी (३९.५ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | १६४ फूट (५० मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ३,७०,७०२[1] | |
- घनता | ३,६२० /चौ. किमी (९,४०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
comune.firenze.it |
ऐतिहासिक काळापासून फ्लोरेन्स हे इटली व युरोपामधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले गेले आहे. विशेषतः मध्ययुग व रानिसां काळांत चित्रकला, शिल्पकला व वास्तूशास्त्र ह्या विषयांमध्ये फ्लोरेन्सचे योगदान अमुल्य मानले जाते. सर्वानुमते रानिसांचा उगम फ्लोरेन्स येथेच झाला. मध्ययुगात व्यापार व अर्थकारणारे केंद्र असलेले फ्लोरेन्स हे त्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या व श्रीमंत शहरांपैकी एक होते.[2][3] रानिसां दरम्यानच्या फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकाची फ्लोरेन्स ही राजधानी होती.
येथील ऐतिहासिक वास्तूंमुळे फ्लोरेन्स हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले गेले आहे व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. फ्लोरेन्समध्ये अनेक कला दालने व संग्रहालये असून येथे दरवर्षी अंदाजे १५ लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.