फ्लॉरेन्स नाइटिंगेल
इंग्रजी समाजसुधारक, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक / From Wikipedia, the free encyclopedia
फ्लॉरेन्स नाइटिंगेल (मे १२,१८२० - ऑगस्ट १३,१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्यादिन" म्हणून साजरा केला जातो.[1]
जलद तथ्य फ्लॉरेन्स नाइटिंगेल, जन्म ...
फ्लॉरेन्स नाइटिंगेल | |
---|---|
जन्म |
१२ मे १८२० (1820-05-12) फ्लोरेन्स, इटली |
मृत्यू |
१३ ऑगस्ट, १९१० (वय ९०) पार्क लेन, लंडन, युनायटेड किंग्डम |
पेशा | परिचारिका व संख्याशास्त्रज्ञ |
प्रसिद्ध कामे | परिचारिका व्यवसायाला आधुनिक स्वरूप आणले |
ख्याती | रुग्णालय स्वच्छता, रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद |
पुरस्कार | रॉयल रेड क्रॉस (१८८३), ऑर्डर ऑफ मेरीट (कॉमनवेल्थ) (१९०७) |
स्वाक्षरी |
बंद करा