पीटर हेवूड
From Wikipedia, the free encyclopedia
पीटर हेवूड (इंग्लिश: Peter Heywood) (६ जून, इ.स. १७७२ - १० फेब्रुवारी, इ.स. १८३१) हा एक ब्रिटिश नौसेनाधिकारी[श 1] होता. तो २८ एप्रिल, इ.स. १७८९च्या एच.एम.एस. बाउंटी या नौकेवर झालेल्या बंडाळीदरम्यान बोटीवर होता. त्या बंडाळीत त्याने सहभागही घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली व बंडखोर म्हणून फाशीची शिक्षा झाली होती. पण नंतर त्याला माफी देण्यात आली. तो नौसेनेवर परत रुजू झाला व २९ वर्षे तेथे नौकरी करून, तो पोस्ट-कॅप्टन या पदावर पोहोचून निवृत्त झाला.
जलद तथ्य पीटर हेवूड, जन्म ...
पीटर हेवूड | |
---|---|
जन्म |
६ जून १७७२ (1772-06-06) डग्लस, आईल ऑफ मान |
मृत्यू |
१० फेब्रुवारी, १८३१ (वय ५८) लंडन, इंग्लंड |
शिक्षण | सेंट बीज शाळा, इंग्लंड, इंग्लंड |
पेशा | रॉयल नेव्हीमधील अधिकारी |
जोडीदार | फ्रांसेस जॉलिफे |
अपत्ये | एक मुलगी |
वडील | पीटर जॉन हेवूड |
आई | एलिझाबेथ हेवूड |
बंद करा