पशुपतिनाथ मंदिर
काठमांडू, नेपाळ मधील हिंदू मंदिर / From Wikipedia, the free encyclopedia
पशुपतिनाथ मंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर वसलेले शिव मंदिर आहे. या मंदिर संकुलाचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक आहे.[1]
जलद तथ्य पशुपतिनाथ मंदिर, नाव ...
पशुपतिनाथ मंदिर | |
---|---|
पशुपतिनाथ मंदिर | |
पशुपतिनाथ मंदिर | |
नेपाळ मधील मंदिराचे स्थान | |
नाव | |
संस्कृत | पशुपतिनाथमन्दिरम् |
मराठी | पशुपतिनाथ मंदिर |
भूगोल | |
गुणक | 27°42′35″N 85°20′55″E |
देश | नेपाळ |
राज्य/प्रांत | बागमती नदी |
जिल्हा | काठमांडू |
स्थानिक नाव | पशुपतिनाथ मंदिर |
स्थान | काठमांडू |
संस्कृती | |
मूळ आराध्यदैवत | पशुपति |
महत्त्वाचे उत्सव | महाशिवरात्र, तीज, बला चतुर्दशी |
स्थापत्य | |
स्थापत्यशैली | पॅगोडा |
इतिहास व प्रशासन | |
स्थापना | इ.स. पूर्व ४३८० |
बांधकामाचे वर्ष | ५ वे शतक |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा
हे मंदिर जांबूद्वीप क्षेत्रावरील तामिळ पादल पेट्र स्थलम (महादेवाचे पवित्र शिवलिंग) मधील २७५ लिंगापैकी एक आहे. शिव पुराणातील कोटिरुद्र संहितेच्या अकराव्या अध्यायात याचा उल्लेख 'उत्तरे कडील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे शिवलिंग असून सर्व इच्छांचा दाता' असा आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. त्याकाळी पशुपति ही नेपाळची राष्ट्रीय देवता तथा आराध्य दैवत होते.[2]