झांझिबार
From Wikipedia, the free encyclopedia
झांझिबार (उच्चार:zænzɨbɑr;फारसी:زنگبار - झंगीबार/जंगीबार, गंजलेला किनारा;अरबी:زنجبار - झंजिबार)हा पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हा प्रदेश हिंदी महासागरातील टांझानियाच्या किनाऱ्यापासून २५-५० किमी दूर झांझिबार द्वीपकल्पावर वसला आहे. उंगुजा (ज्याला रोजच्या वापरात झांझिबार संबोधले जाते) व पेंबा ही ह्या द्वीपकल्पातील प्रमुख बेटे आहेत. झांझिबारच्या दक्षिणेला कोमोरोस व मायोत, आग्नेयेला मॉरिशस व रेयूनियों व पूर्वेला सेशेल्स ही बेटे आहेत.
जलद तथ्य
झांझिबार Zanzibar | ||
टांझानियाचा स्वायत्त प्रदेश | ||
| ||
झांझिबारचे टांझानिया देशामधील स्थान | ||
देश | टांझानिया | |
राजधानी | झांझिबार शहर | |
क्षेत्रफळ | २,६४३ चौ. किमी (१,०२० चौ. मैल) | |
लोकसंख्या | १०,७०,००० | |
बंद करा