ग्रेट लेक्स
From Wikipedia, the free encyclopedia
ग्रेट लेक्स (इंग्लिश: Great Lakes; भव्य सरोवरे) ही उत्तर अमेरिका खंडाच्या ईशान्य भागात अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा देशांच्या सीमेवरील गोड्या पाण्याची मोठी सरोवरे आहेत. ग्रेट लेक्समध्ये मिशिगन सरोवर, ह्युरॉन सरोवर, ईरी सरोवर, सुपिरियर सरोवर व ओन्टारियो सरोवर ह्या ५ सरोवरांचा समावेश होतो. एकत्रितपणे ग्रेट लेक्स हा पृथ्वीवरील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तर घनफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा (रशियातील बैकाल सरोवराखालोखाल) मोठा गोड्या पाण्याचा संचय आहे.[1][2] ग्रेट लेक्सच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ २,०८,६१० चौरस किमी व घनफळ २२,५६० घन किमी इतके आहे. जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी २१ टक्के पाणी ग्रेट लेक्समध्ये एकवटले आहे.