खान्देश
उत्तर महाराष्ट्रतील भौगोलिक प्रदेश आणि इंग्रजांच्या काळात एक जिल्हा, मध्य युगात एक सुभा / From Wikipedia, the free encyclopedia
खान्देश (इंग्रजी : Khandesh) भौगोलिक प्रदेशात महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्याचा समावेश व्हायचा, तसेच नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही खान्देशात समावेश होतो. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. आता खान्देशमध्ये जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा समावेश होतो.
खान्देश
| |
---|---|
ऐतिहासिक प्रदेश | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश |
जिल्हे |
१]नंदुरबार २]धुळे ३]जळगाव ४]बऱ्हाणपूर |
भाषा |
मराठी अहिराणी भिली हिंदी |
सर्वात मोठे शहर | जळगाव |
वासीनाम | खान्देशी |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
Elevation | २४० m (७९० ft) |
इंग्रजांच्या काळात खान्देश हा जिल्हा होता, त्यात आताच्या जळगाव, नंदुरबार, नाशिकचा जिल्ह्याचा उत्तर भाग आणि धुळे जिल्ह्याचा समावेश व्हायचा. १९०५ ला खान्देश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पश्चिम खान्देश आणि पूर्व खान्देश हे दोन जिल्हे तयार करण्यात आले. पश्चिम खान्देशमध्ये नंदुरबार-धुळे जिल्ह्यांचा समावेश व्हायचा, तर पूर्व खान्देशमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश व्हायचा. प. आणि पु. खान्देशचे मुख्यालय अनुक्रमे धुळे आणि जळगाव होते. खान्देशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.