ऑपरेशन चॅस्टाइझ
From Wikipedia, the free encyclopedia
ऑपरेशन चॅस्टाइझ हे दुसऱ्या महायुद्धदरम्यान १६-१७ मे १९४३च्या रात्रीत ब्रिटनच्या रॉयल एरफोर्सतर्फे जर्मनीच्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणाऱ्या बॉंब (bouncing bomb)चा वापर करण्यात आला. या विशिष्ट रचनेच्या बॉंबमुळेच ही कारवाई यशस्वी ठरली. लक्ष्यावर आदळल्यावर लगेच स्फोट न होता, उसळ्या घेत काही अंतर कापून फुटणारा हा बॉंब बार्न्स वॉलिस यांनी शोधला व विकसित केला होता.[1] या कारवाईअंतर्गत मॉहने धरण आणि एडरसी धरण उध्वस्त झाले तर सोर्पे धरणास जुजबी नुकसान झाले.
जलद तथ्य दिनांक, स्थान ...
ऑपरेशन चॅस्टाइझ
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | १६-१७ मे, १९४३ |
---|---|
स्थान | इडर, मॉहने आणि सॉर्पे नद्या, जर्मनी |
परिणती | ब्रिटिश सैन्याचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
युनायटेड किंग्डम | जर्मनी |
सेनापती | |
गाय गिब्सन | जोसेफ कॅमह्युबर |
सैन्यबळ | |
१९ लॅंकेस्टर बॉम्बफेकी विमाने | १२वे फ्लीगरकोर |
बळी आणि नुकसान | |
८ विमाने पाडली गेली ५३ वायुसैनिक मृत्युमुखी ३ वायुसैनिक युद्धबंदी |
२ धरणे उद्धवस्त १ धरण क्षतिग्रस्त अंदाजे १,६०० नागरिक मृत्युमुखी (यांतील १,०००+ सोव्हिएत युद्धबंदी आणि वेठबिगारी कामगार होते). |
बंद करा