उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
From Wikipedia, the free encyclopedia
उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्याचा सरकारप्रमुख असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री उत्तर प्रदेशच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री हा उत्तर प्रदेश विधीमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद ह्यांपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ उत्तर प्रदेश राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.
जलद तथ्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, शैली ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री | |
---|---|
उत्तर प्रदेशचे चिन्ह | |
शैली | राज्यसरकार प्रमुख |
वरिष्ठ अधिकारी | उत्तर प्रदेशचे राज्यपाल |
मुख्यालय | लखनौ |
नियुक्ती कर्ता | उत्तर प्रदेशचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
निर्मिती | २६ जानेवारी १९५० |
पहिले पदधारक | गोविंद वल्लभ पंत |
बंद करा
१९५० सालापासून एकूण २१ व्यक्ती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ११ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. भारतीय जनता पक्षचे योगी आदित्यनाथ हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.