उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्र
भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र / From Wikipedia, the free encyclopedia
उत्तर पूर्व सीमा रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५८ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय गुवाहाटी येथे असून संपूर्ण ईशान्य भारताची सर्व राज्ये (आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड, त्रिपुरा व सिक्किम) तसेच पश्चिम बंगाल व बिहार राज्यांचा काही भाग उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या अखत्यारीत येतो.