इडो किल्ला
From Wikipedia, the free encyclopedia
इडो किल्ला (江戸城), तथा चियोदा किल्ला (城 田 城) हा जपानमधील एक भुईकोट किल्ला आहे. याची रचना १४५७ मध्ये एता दाकानने केली होती. हा किल्ला आता तोक्यो शाही महालाचा एक भाग आहे. सध्याच्या मुयोशी प्रांताच्या तोशिमा जिल्हा, चियोदा गावाजवळ अशलेल्या या किल्ल्याला आधी इदो म्हणून ओळखले जात असे.[1] तोकुगावा इयेआसू यांनी येथे तोकुगावा शोगुनतीची स्थापना केली. हे शोगुनचे निवासस्थान आणि शोगुनतीचे मुख्यालय होते आणि जपानी इतिहासाच्या इदो काळात लष्करी राजधानी म्हणून देखील कार्यरत होती. शोगुनच्या राजीनाम्यानंतर आणि मेजीच्या पुनर्स्थापनेनंतर या किल्ल्याचे रूपांतर शाही निवासस्थानात केले गेले. किल्ल्याचे काही खंदके, भिंती आणि तटबंदी अजूनही तशाच आहेत. इदो कालावधीत हा किल्ला अधिक मोठा होता. सध्याचे तोक्यो स्थानक आणि तोक्यो शहराचा मारुनुची विभाग सर्वात बाह्य खंदक मध्ये बनविलेला आहे. तसेच यात कितानोमारू पार्क, निप्पॉन बुडोकान हॉल आणि आसपासच्या परिसरातील इतर खुणादेखील आहेत.[2]
इडो किल्ला 江戸城 | |
---|---|
चियोडा, टोकियो, जपान | |
हे एक १7 व्या शतकातील इडो किल्ल्याचे स्क्रीन पेंटिंग आहे. यात आसपासचे निवासी वाडे आणि खंदक दिसत आहेत . | |
प्रकार | भूईकोट किल्ला |
जागेची माहिती | |
द्वारे नियंत्रित | इम्पिरियल हाउसहोल्ड एजन्सी |
परिस्थिती | बहुतेक ठिकाणी पडझड झालेले अवशेष आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर कही भागांची पुनर्रचना केली होती. सध्या टोकियो इम्पीरियल पॅलेस म्हणून वापरात आहे. |
Site history | |
बांधले | १४५७ |
याने बांधले | एटा डेकन, टोकुगावा इयेआसू |
सध्या वापरात | १४५७ – सध्या (टोकियो इम्पीरियल पॅलेस म्हणून) |
साहित्य | ग्रेनाइट दगड, मातीची गढी, लाकूड |
उध्वस्त झालेले | १६५७ मध्ये तेन्शु (कोठार) आगीने नष्ट झाले होते, बाकीचा बहुतेक भाग ५ मे १८७३ रोजी दुसऱ्या मोठ्या आगीमुळे नष्ट झाला होता. सध्या टोकियो इम्पीरियल पॅलेस म्हणून वापरात आहे. |
किल्ल्यात ठेवलेली शिबंदी | |
रहिवासी | टोकुगावा शोगुनेट, मीजी कालावधीपासून जपानी सम्राट आणि शाही कुटुंब |