आर्थर मिलर
अमेरिकन नाटककार व निबंधकार / From Wikipedia, the free encyclopedia
आर्थर अॅशर मिलर (इंग्लिश: Arthur Asher Miller) (१७ ऑक्टोबर, इ.स. १९१५ - १० फेब्रुवारी, इ.स. २००५) हा अमेरिकन नाटककार व निबंधकार होता. अमेरिकन रंगभूमीच्या क्षेत्रात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याने ऑल माय सन्स (इ.स. १९४७), डेथ ऑफ अ सेल्समन (१९४९), द क्रुसिबल (इ.स. १९५३), इत्यादी प्रसिद्ध नाटके लिहिली आहेत.
जलद तथ्य आर्थर मिलर, जन्म नाव ...
आर्थर मिलर | |
---|---|
जन्म नाव | आर्थर अॅशर मिलर |
जन्म |
१७ ऑक्टोबर, इ.स. १९१५ हार्लेम, न्यू यॉर्क |
मृत्यू | १० फेब्रुवारी, इ.स. २००५ |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | नाटककार, निबंधकार |
भाषा | इंग्लिश |
साहित्य प्रकार | नाटक, निबंध |
प्रसिद्ध साहित्यकृती | डेथ ऑफ अ सेल्समन, द क्रुसिबल, अ व्ह्यू फ्रॉम द ब्रिज |
स्वाक्षरी |
बंद करा
हाऊस अन-अमेरिकन अॅक्टिव्हिटीज् कमिटीपुढे द्यावी लागलेली साक्ष, नाटकासाठी मिळालेला पुलित्झर पुरस्कार, मर्लिन मन्रोशी लग्न इत्यादी घडामोडींमुळे तो १९४०, १९५० आणि १९६० च्या दशकांत सतत चर्चेत राहिला.